श्री स्वामी समर्थ भक्तांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक !

भक्तनिवास नोंदणीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. मागील एक मासामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे.

नागपूर विद्यापिठातील ७ विभागांकडून खंडणी वसुली प्रकरणी प्रा. धर्मेश धवनकर सक्तीच्या रजेवर !

नागपूर विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने पाठवले सक्तीच्या रजेवर !

धुळे येथे ‘श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करीन’ अशी धर्मांधाची हिंदु तरुणीला धमकी !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘ईडी’कडून चौकशी

‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विमा आस्थापनाच्या अधिकार्‍याला वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात नेले !

जिल्ह्यातील सवालाख शेतकर्‍यांना पीक विमा आस्थापनांनी लुटले, तसेच मोठा घोळ केला, असा दावा केला जात आहे. भरलेला आणि मिळालेला पीक विमा यांत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला..

केंद्राने कायदे करावेत !

धर्मांतरविरोधी कायदा हा लव्ह जिहादच्या आघातांसाठी पुरेसा नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता आहे. जर धर्मांतरविरोधी कायदा झाला, तर केंद्राला तोही करणे सोपे जाईल. त्यामुळे हिंदुहिताचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने हिंदूंना आश्वस्त करावे !  

वीजदेयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना झारखंडमधून अटक !

अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

आणखी ५ भूमाफियांना अटक, एकूण आरोपींची संख्या १० !

डोंबिवली येथील ६५ अवैध इमारत प्रकरणांशी संबंधित आणखी ५ भूमाफियांना २३ नोव्हेंबरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. या भूमाफियांनी सर्वसामान्य नागरिकांना अवैध इमारतीमध्ये घर विकून फसवणूक केली आहे.

मुसलमान तरुण हिंदु असल्याचे दाखवून झाला सैन्यात भरती !

सैन्यात भरती होण्यामागे मुसलमान तरुणाचा काय उद्देश होता, याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे !

दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश !

सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे हे १०० ग्रॅमची अचूकता दर्शवतात. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक हानी होते. यावर दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाने नुकतेच दिले.