नाशिकच्या धनलक्ष्मी शाळेत रोबोच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिकमध्ये स्वतंत्र दिनी धनलक्ष्मी शाळेत रोबोच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील धनलक्ष्मी बालविद्यामंदिर आणि प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रोबोटिक्स पद्धतीने ध्वजारोहण अन् संचलन करण्यात आले.

१५ ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवणार ! – करणी सेना

१५ ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकामध्ये राष्ट्रध्वज फडकवू, अशी घोषणा करणी सेनेचे सुखदेव सिह गोगामेडी यांनी केली आहे. देशभरात वाहन यात्रा काढण्यात येईल.

टिटवाळा (जिल्हा ठाणे) येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांकडून चिनी मालाची होळी

टिटवाळा येथे सहा शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करत चिनी वस्तू आणि माल यांच्यावर बहिष्कार टाकला. तसेच त्या वस्तूंची होळी करत जनजागृती फेरी काढण्यात आली.

राज्यात पालकमंत्र्यांना ध्वजारोहणास आडकाठी आणू पहाणार्‍या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी सुकाणू समितीने स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू न देण्याची चेतावणी दिली होती.

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणार्‍या मदरशांच्या संबंधितांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाई होणार !

उत्तरप्रदेश शासनाने आदेश देऊनही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत न गाण्याच्या प्रकरणी सरकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे.


Multi Language |Offline reading | PDF