वीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट !

मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास भेट

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ जुलैला भेट दिली. ते म्हणाले, रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होऊ शकते.

पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री

पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा युतीचीच सत्ता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शरद पवार जे म्हणतात, नेहमी त्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांनी सरकार पडेल म्हटले, म्हणजे आमचे शासन अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसमवेत बंडखोरी करणारे कधीही निवडून आले नाहीत ! – अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प केला, तशाच प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्रात घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरील कर लवकरच अल्प करण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.

‘हिंदुत्व’ हेच आमचे धोरण : हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही ! – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही जे केले, त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांच्याकडेच आम्ही गेलो आहोत. हिंदुत्व हेच आमचे धोरण असून पदासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही !

एकनाथ शिंदे आणि माझ्यात कधीही कुरघोडी राजकारण दिसणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहेत. ते कुशल संघटक असून जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहेत. अनेकदा पदे मिळाल्यावर व्यक्ती माणुसकी विसरतो; परंतु एकनाथ शिंदे हा माणुसकी असलेला नेता आहे.

शासनाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आज मतदान !

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले.