कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यावर चर्चा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सध्या चालू असलेल्या, तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील महापूर, तसेच अतीवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली.

विधीमंडळाच्या सचिवांकडून शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयांत कार्यक्षमपणे राबवावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा उपक्रम कार्यक्षमपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

वारीत सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वत:च्या प्रवासासाठी दिला जाणारा विशेष राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांनी नाकारला !

‘हे सर्वसामान्यांचे शासन असून महनीय व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य द्यावे’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला !

मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर येऊन एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.

ठाणे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचे काम १५ दिवसांत चालू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय उभारण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना विनामूल्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत…

आषाढी वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकर माफी !

वारकर्‍यांनी वाहनांवर ‘स्टिकर्स’ लावण्याच्या, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांकडे नोंदणी करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.