महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन  

राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली.

उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेतील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे !

शैक्षणिक आरक्षण उठल्यास सदर जागी उपहारगृह, निवासी उपहारगृह, मद्यालय, व्यावसायिक बांधकाम होण्याची शक्यता आहे.

हिंदुद्वेषाची अडगळ !

हिंदु समाजात घडणार्‍या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु धर्मच वाईट आहे’, असे सहज वाटू शकेल. त्याला आक्षेप आहे आणि राहील.

उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास फटकारले आहे.

बलात्कार्‍यांना शिक्षा !

भारत मुळात महिलांचा सन्मान करणारा देश आहे. महिलांच्या शीलरक्षणाची आमची परंपरा आहे. पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणापोटी, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रभावाखाली राहिलेली आजची पिढी भरकटलेली असली, तरी आता तो काळ मागे पडत चालला आहे, हेच या प्रकरणातून दिसून येते.

१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.

इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्‍या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.