‘हवेतल्या’ गोष्टी !

सरकारी बाबूंची अशी पराकोटीची असंवेदनशीलता, म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशांवर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार आणि अशा ‘हवेतल्या’ गोष्टी थांबणार नाहीत, हेच खरे !

हिंदूंच्या सहिष्णुतेची पोचपावती !

आता आवश्यकता आहे ती भारताची अपकीर्ती करण्यासाठी कार्यरत असलेल्या साखळीचा भांडाफोड करण्याची आणि त्यांना दंडित करण्याची !

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

पुन्हा ताजमहाल !

तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

‘पोस्टरबाजी’त अडकलेले नेते !

निवडणुकीच्या कालावधीत घोषणांची खैरात करणाऱ्या नेतेमंडळींची जनतेला आता सवय झाली आहे; मात्र आता घोषणांसह ‘पोस्टरबाजी’चाही (भित्तीपत्रकांचा) अतिरेक आपणाला पहायला मिळतो.

हिंदूंची गळचेपी करणारे कायदे रहित करा !

काशी विश्वनाथ आणि द्वारका येथे भव्य मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदूंनी दबावगट निर्माण करावा ! 

यशामागील संघर्ष !

इंदूर येथील एक घटना सध्याच्या तरुणाईसाठी, विशेषतः प्रतिकूल स्थितीत शैक्षणिक भवितव्य घडवू पहाणार्‍यांसाठी निश्चितच आदर्श आहे. एका भाजी विक्रेत्याची मुलगी असणारी अंकिता नागर ही तरुणी इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश झाली आहे.

अमेरिका पुराणमतवादी होणार ?

स्वातंत्र्याला या संयमाचे आणि त्यागाचे कोंदण असल्यास कुठलीही कृती ही विवेकाला धरून होते. ‘अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतन तेथील समाजधुरिणी रोखतील का ?’, हे ठाऊक नाही; मात्र भारतात तशी स्थिती उद्भवू नये; म्हणून आदर्श समाजरचनेविषयी नियम सांगणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !