कर्नाटकमध्‍ये महिलांना बस प्रवास निःशुल्‍क झाल्‍यामुळे मंदिरांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ !

राज्‍यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्‍ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्‍या वर्षी ही रक्‍कम १९ कोटी रुपये होती. हे वाढलेले उत्‍पन्‍न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्‍यांनी लोकांना सांगावे !

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !

मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती !

कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांचा कारावास !

कोळसा घोटाळा हा ११ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे या घोटाळ्यामुळे पोळलेल्या सामान्य माणसांना ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्याय’, असे वाटल्यास चूक ते काय ?

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम दिली जाणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंपदा विभागाची कामे करतांना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी, या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात पालट करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल.

रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर

जिल्ह्यात मागील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसासमवेत वेगवान वार्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांची हानीही झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भूस्खलनाचाच आहे.

लाभात असलेल्या बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील, तर अन्य विभागांकडून चालवाव्यात !

दापोली-शिर्डी बससेवा ही बस निमआराम (सेमी) केल्यापासून पुणेपर्यंत चालवली जात आहे. दापोलीतून सुटणार्‍या परळी, शिर्डी, अक्कलकोट आणि विजापूर बससेवा बंद करण्याचा घाट !

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !