रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर २५० किलोंहून अधिक चरस जप्त

ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.

‘रत्नागिरी-८’ या भाताच्या वाणाची विक्रमी ८० टन विक्री

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘रत्नागिरी-८’ या बियाण्याची लागवड केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी आणि फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रांवर मिळून ८० टन बियाण्यांची विक्री झाली.

केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार !

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध न्यायालयांत ५२ लाख खटले प्रलंबित !

३१३ खटले २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याची प्रकिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित !

ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांच्या मानधनात केली ५०० रुपयांची वाढ !

मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे.  ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

(म्हणे) ‘पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर भारताच्या उत्पादनांवर लावणार कर !’-डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या अशा दादागिरीला भारत भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे आहे ! भारतीय बाजारपेठेची अमेरिकेला आवश्यकता आहे, हे भारत जाणून आहे !

जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन गंभीर आर्थिक संकटात ! – विशेषज्ञांचे मत

इलियट यांच्या मते ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या अंतर्गत लागलेल्या दळणवळण बंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था खालावली, असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आधीपासून मंदी येऊ लागली होती.

प्राचीन स्मारकांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणार !

पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे !

केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली !

सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा वरील प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री रेणुकामाता मंदिरात चोरी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्‍या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !