शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरीक्षेत्रात पालट !

हा आराखडा मार्गी लागल्यामुळे कोकणातील ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प, तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील. यामुळे पायाभूत सुविधांच्या कामांनाही चालना मिळेल.

मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये चोरी करणार्‍या तिघांना अटक

संशयित फेरीवाले रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती दलाने तिघांना कह्यात घेतले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली.

 रिक्शा भाडे, वजनमापे आणि खाद्यपदार्थांच्या तपासणीचे जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांचे निर्देश !

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज २५ ऑगस्ट बैठक झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या.

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ

‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !

(म्हणे) ‘भारतीय उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार !’ – ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’

येणार्‍या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !

(म्हणे) ‘ब्रिटनने भारताला केलेले आर्थिक साहाय्य भारताने परत करावे !’ – पॅट्रिक क्रिस्टिसन, जी.बी.एन्. या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक

ब्रिटीश गुंडांच्या टोळीने जगाला लुटून स्वत:चा देश उभा केला, हे त्यांच्या वंशजांना ठणकावून सांगायची आता वेळ आली आहे !

भारत जगात सर्वाधिक गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ! – पंतप्रधान मोदी

वैश्‍विक अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर असतांना ‘ब्रिक्स’ देशांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. अशातच भारत सर्वाधिक गतीने वृद्धींगत होणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.

नागोठणे येथील मटका जुगार बंद करण्याची मागणी !

दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय होत असतांना आणखी वेगळी कोणती माहिती घेऊन पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे ? तेथील अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावरच कारवाई करणे अपेक्षित आहे !

चीनच्या आर्थिक मंदीचा संपूर्ण जगाला बसणार फटका !

आर्थिक मंदीच्या चीनवरील टांगत्या तलवारीचा परिणाम संपूर्ण जगावरच होणार आहे. जगातील दुसर्‍या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीमुळे जागतिक स्तरावर मंदीची लाट येईल अशी भीती आहे.

पाकच्या राष्ट्रीय विमान वाहतूक आस्थापनावर आर्थिक संकट

भिकेला लागलेल्या पाकिस्तानची स्थिती हळू हळू अशीच होत रहाणार आहे आणि एके दिवशी त्याला दिवाळखोर घोषित केले जाणार. तो दिवस आता दूर राहिलेले नाही !