१४ ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व टोलनाक्यांवर कॅमेरे लावणार ! – राज ठाकरे

राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल.

गोवा : कळंगुट पोलिसांची अनधिकृत दलालांवर कारवाई 

अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !

ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला टाळे !

सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्‍ये २ कोटी रुपये गुंतवले होते.

सरकारने ‘हाफकीन’चे पैसे रखडवल्‍याने वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही !

सरकार १५० कोटी रुपये विज्ञापनासाठी व्‍यय करते; मात्र ‘औषध खरेदीसाठी पैसे देत नाही’, सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत असल्‍याचा अंबादास दानवेंचा आरोप !

सातारा येथे मनसेच्‍या आंदोलनानंतर १३ अनधिकृत दुकान गाळे ‘सील’

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या आंदोलनाची नोंद घेत सातारा नगर परिषदेच्‍या अतिक्रमण विभागाकडून विनाअनुमती उभारण्‍यात आलेले १३ दुकान गाळे ‘सील’ करण्‍यात आले.

गरीब कुटुंबातील मुलीसाठी राज्‍यशासन १ लाख रुपये देणार !

राज्‍यातील पिवळ्‍या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या मुलीला राज्‍यशासन ‘लेक लाडकी’ योजनेद्वारे १ लाख १ सहस्र रुपये अर्थसाहाय्‍य देणार आहे.

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्‍या घरावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्‍या घरावर धाड घातली. देहली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवलेल्‍या २ गुन्‍ह्यांच्‍या अंतर्गत ईडीने ही कारवाई केली.

नमन कलावंतांचे उर्वरित प्रस्ताव शासनाने तातडीने संमत करावेत !

नमन कलावंतांचे १९२ प्रस्ताव संमत झाले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांतील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव उशिरा पोचल्यामुळे संमतीच्या प्रतीक्षेत आहेत.

शासन आदेश डावलून ठेकेदारांकडून अवैध टोलवसुली !

आदेश डावलणार्‍यांवर इतके वर्षांत शासनाने कारवाई का केली नाही ? या टोलवसुलीचा पैसा सरकारी तिजोरीत जमा होत नाही, तर मग कुणाकडे जातो ?

‘ड्रग माफिया’ ललित ‘ससून रुग्‍णालया’मध्‍ये रहाण्‍यासाठी प्रतिदिन ७० सहस्र रुपये देत असल्‍याचे उघड !

प्रकृती अस्‍वास्‍थ्‍याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्‍ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीची यंत्रणा राबवत होता.