डोकलामनंतर चिनी सैन्याची लडाखमध्ये घुसखोरी !

डोकलाम प्रकरणाला एक वर्ष होत असतांनाच चिनी सैन्याने जुलै मासाच्या पहिल्या आठवड्यात लडाखच्या डेमचॉक सेक्टरमध्ये भारताच्या सीमेमध्ये ४०० मीटरपर्यंत घुसखोरी करत ५ तंबू उभारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोकलाम वाद सोडवल्यानंतरही चीनचे सैनिक तेथून माघारी गेले नाहीत ! – माजी परराष्ट्र सचिवांचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षी १६ जूनला चीन आणि भूतान यांच्या सीमेवरील डोकलाम क्षेत्रामध्ये चीनने रस्ता बांधण्याचा प्रयत्न चालू केल्यावर भारताने त्याला विरोध केला होता. यामुळे जवळपास अडीच मास दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ……

(म्हणे) ‘डोकलामचा प्रश्‍न सुटला आहे !’ – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

डोकलामचा प्रश्‍न कूटनीतीद्वारे सोडवण्यात आला आहे आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिली. 

डोकलाम नव्हे, तर सीमेवरील तणाव दूर करणे आणि पर्यावरणातील पालट यांवर चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍यात डोकलाम आणि चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग यांसदर्भात थेट चर्चा झालेली नाही; मात्र सीमेवरील तणाव न्यून करणे, दोन्ही देशांच्या नेतृत्वामधील संवाद वाढवणे आणि व्यापार संबंध सुधारण्यावर भर देण्याविषयी दोन्ही नेत्यांचे एकमत झाले

डोकलामवरून मोदी चीनला खडसावणार का ? – काँग्रेसचा प्रश्‍न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेमध्ये मोदी भारताच्या रणनैतिक हितांचे रक्षण करून डोकलामविषयी चीनकडे रोखठोक विचारणा करतील का ?, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘ट्वीट’द्वारे केली आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये कुरापतखोर चीनने छावण्या बांधल्या !

डोकलामच्या सूत्रावरून वाद चालू असतांनाच चीनने आता अरुणाचल प्रदेशमध्ये नव्या कुरापती करण्यास प्रारंभ केला आहे. अरुणाचल प्रदेशमधील किबिथु या भागात चीनने छावण्या आणि घरे बांधल्याचे उघड झाले आहे.

चीनने डोकलाममध्ये १.३ कि.मी.चा रस्ता बांधला

सिक्किम, भूतान आणि तिबेट या ‘ट्राय जंक्शन’ जवळ डोकलाम येथे चीनने १.३ कि.मी.चा रस्ता बनवला आहे. या रस्त्यामुळे आता चिनी सैनिक दक्षिण डोकलाममधील जम्फेरी रिजपर्यंत सहज पोहोचू शकतील.

चीनने डोकलाममध्ये सैन्य उभे केल्याचे ‘सॅटलाईईट’वरील छायाचित्रांद्वारे उघड

डोकलाममधील ज्या भागावर चीन दावा सांगत आहे, तेथेच चीनने लष्करी साम्राज्य निर्माण केले आहे. याशिवाय डोकलाम पठाराच्या भागात चीनने विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले असून ‘हेलिपॅड’ही निर्मिले आहेत.

डोकलाममध्ये प्रचंड थंडीत पहिल्यांदाच १ सहस्र ८०० हून अधिक चिनी सैनिक तैनात

थंडीचा प्रभाव वाढत असतांना चीनकडून डोकलाम भागात १ सहस्र ७०० हून अधिक सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. अशाप्रकारे थंडीमध्ये चिनी सैन्याने पहिल्यांदाच डोकलाममध्ये वास्तव्य केले आहे.

(म्हणे) डोकलाम आमचाच भाग असल्याने तेथे सैन्य तैनात करणार !

डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि हेच लक्षात ठेवून त्या भागात आमच्याकडून सैन्य तैनात केले जाईल, असे विधान चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कोल वू कियान यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF