दीपोत्‍सव म्‍हणजे ज्ञानाच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे !

दीपोत्‍सव हा केवळ उत्‍सव नाही, तर उत्‍सवांचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळीपासून चालू होणारे नवे आर्थिक वर्ष (बलीप्रतिपदा) आणि भाऊबीज, असे ५ उत्‍सव म्‍हणजे दीपावली !

कॅनडाच्या संसदेत आयोजित दिवाळी समारंभाच्या वेळी ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावला !

कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.

दिवाळीमध्ये वाहतुकीचे नियम शिथिल करा ! – ठाकरे गटाची पोलीस प्रशासनाकडे मागणी

सातारा शहरात वाहनतळाचा प्रश्‍न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारावासीय गेल्यावर त्यांच्या वाहनांना जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांवर कारवाई करते.

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

‘रेडिमेड’ दिवाळी !

पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आरामदायी गाड्यांच्या मालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबावा !

खासगी बसगाड्यांकडून होणारी लूट थांबवण्याविषयी एका पत्रकाराला आवाज उठवावा लागतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! प्रशासन स्वतःहून अशा गोष्टींची नोंद घेऊन कार्यवाही का करत नाही ?

आशा स्वयंसेविकांना २ सहस्र रुपये दिवाळी बोनस !

सद्य:स्थितीत राज्यात ८० सहस्रांहून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना ५ सहस्र रुपये मानधन देण्यात येत होते. आता आरोग्यमंत्र्यांच्या वरील घोषणेनंतर आशासेविकांना १५ सहस्र रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

सणांच्या काळात छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करा ! – पंतप्रधान मोदी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासियांना केवळ ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करतो. स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने अवश्य खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाद्वारे भारतियांना केले.

Tulsi Vivah : तुळशी विवाह

तुलसीदेवीला प्रार्थना करून तिला वंदन करावे. पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

Diwali 2023 Dhanteras : धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यू येऊ नये; म्हणून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे.