काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरातील श्रृंगार गौरीदेवीची पूजा करण्याचा अधिकार देण्याच्या मागणीसाठी याचिका

हिंदूबहुल भारतात हिंदूंना स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एक तर न्यायालयात याचिका प्रविष्ट कराव्या लागतात किंवा आंदोलने करावी लागतात, हे लज्जास्पद !

देहली हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी मनिंदर सिंह याला अटक : २ तलवारी जप्त

गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये !

गुलामीच्या मानसिकतेतून लिहिण्यात आलेला इतिहास भारताचा इतिहास नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !

भारताचा गौरवशाली इतिहास असताना हा व्हॅलेंटाईन मधेच कुठून आणलास ? छत्रपतींच्या राज्यात मुलींच्या मागे मागे असे फूल घेऊन लागण्यापेक्षा आपले कर्तृत्व एवढे वाढवायला हवे की, प्रत्येक मुलीला वाटायला हवे, ‘मलाही हाच नवरा हवा.’ असे आपले कर्तृत्व करायला हवे, कळले का ?

मथुरेतील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्‍या तिघांना अटक

मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये.

आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आणि पूर्णपणे दिखावा करणारी !  

भारतात विद्यार्थ्यांना शिकवणारा इतिहास चुकीचा आहे.