देशाला खिळखिळे करणार्‍या शक्तींचा निःपात होणारच, हे पंतप्रधानांनी दाखवून दिले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आज आवश्यकता भासल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केला जातो. ३७० कलम हटवून ‘भारताचे तुकडे करू देणार नाही’, असे दुष्ट शक्तींना सांगितले, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे केले.

अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीत !

मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौर्‍याची माहिती घोषित करतील.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘निर्धार फाऊंडेशन’चे राकेश दड्डणावर यांचा सत्कार !

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला राकेशसारख्या युवकांची आवश्यकता आहे. त्यांचे स्वच्छता अभियान खरोखरच कौतुकास्पद आहे. हीच खरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र्रनिष्ठा आहे.’’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू असतांना लोकांनी साहित्य पळवले !

लाभार्थ्यांऐवजी गर्दी केलेल्या लोकांनीच या पेट्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

अजित पवार यांच्या घोटाळ्यांना भाजप संरक्षण देत आहे ! – शालिनीताई पाटील, माजी मंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ सहस्र कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत.

तलाठी भरती परीक्षेत अपव्यवहार झाल्याचे पुरावे मिळाल्यास परीक्षा रहित करण्यात येईल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

तलाठी भरती परीक्षेत मोठा अपव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या विश्‍वस्तांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट !

देवस्थानच्या विकासकामांसाठी भेट घेण्यात आल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांगण्यात आले.

जालना येथे देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना येथे जात असतांना बदनापूर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी बसस्थानक परिसरात काळे झेंडे दाखवले. या वेळी ‘फडणवीस परत जावा’, अशा घोषणाही देण्यात आल्या. डोंगरगाव येथील मराठा आंदोलक विष्णु घनघावने यांनी ही घोषणा दिली.

आमची वाहने अडवल्यास गृहमंत्र्यांच्या घरांसमोर जाऊन बसू !

मनोज जरांगे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेतावणी !