कोरोनामध्ये व्यापार्‍यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेणार ! – फडणवीस

२१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. त्या संदर्भातील परिपत्रक काढले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे.

सौ. नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत् सूत्रधारी आस्थापनाच्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती !

ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीविषयी त्यांचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे मत फडणवीस यांच्यासमोर मांडले आहे

कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळीबार !

‘महेश गायकवाड यांनी कुंपण तोडून माझी भूमी कह्यात घेतली. मी त्यांना न्यायालयाकडून ऑर्डर आणण्यास सांगितले; पण त्यांनी दादागिरी चालूच ठेवली’, असे भाजपचे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

जगात मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी भाषा विद्यापिठाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, तो कोणत्या जाती-धर्मापर्यंत मर्यादित नव्हता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो वैश्विक धर्म सांगितला, त्याचाच हा आपला महाराष्ट्र धर्म आहे.

भाजप सत्तेत असतांना ‘ओबीसी’वर अन्याय होऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने ओबीसी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत.

विदर्भ-मराठवाडा येथील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन, तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

आरक्षणाविषयीच्या अन्य प्रतिक्रिया

बसगाड्या जाळल्या, घरेदारे जाळली, पोलिसांना मारले आदी गुन्हे न्यायालयीन आदेशाखेरीज मागे घेता येत नाहीत. अन्य गुन्हे मागे घेतले जातील.

इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गाण्यासाठी सर्व जणांना एकत्र गावे लागते. प्रत्येकाने वेगळे गाणे गाऊन चालत नाही. ही आघाडी नव्हतीच. त्यामुळे ती यशस्वी होणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.