लव्‍ह जिहादविरोधी कायदा तात्‍काळ संमत करण्‍यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !

या मागण्‍यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !

प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात निष्पन्न !

कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या  पाकच्या महिलेला दिली.

माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी बळकट हवे  ! – अभिजित हेगशेट्ये, अध्यक्ष, नवनिर्माण शिक्षण संस्था

मुलींनी त्यांची माहिती सामाजिकपणे उघड करणे धोकादायक आहे. आई-वडील हेच आपले पहिले मित्र असल्याने आपल्यावर अत्याचार होत असेल, तर आई-वडिलांना विश्वासात घेऊन सांगायला हवे.

महाराष्‍ट्रात ‘राजमाता जिजाऊ युवती स्‍व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ चालू !

मुली आणि महिला यांना स्‍वरक्षण शिकवण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने १५ जुलैपासून प्रत्‍येकी तीन दिवसीय स्‍वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.

(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान

चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !

फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र !

फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !

कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही !  

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्‍वासन !

कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !
आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !
कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !

जपानमध्ये आकाशात दिसले हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे चिनी फुगे !

धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अणूबाँब डागण्याच्या तोफा तैनात !

‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन भारताने पाकला लक्षात राहील, असे आक्रमण त्याच्यावर करणे आवश्यक आहे !