चीनला गोपनीय माहिती पुरवणार्‍या अमेरिकी नौदलातील २ अधिकार्‍यांना अटक

चीन अमेरिकेची गोपनीय माहिती गोळा करू शकतो, तर भारतातील माहिती गोळा करणे त्याला अवघड नसेल, अशीच शंका येते !

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.

गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.

आतंकवाद्याकडे कुलाबा येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या ‘छाबड हाऊस’ची छायाचित्रे सापडली !

सध्या हे दोघे आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित केले आहे. दोन्ही आरोपी ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे फरजना हिने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु प्रियकराशी केला विवाह !

शेकडो हिंदु मुली लव्हा जिहादला बळी पडतात; मात्र हिंदु पालक कधीही अशा प्रकारची धमकी देत नाहीत; मात्र एखाद्या घटनेत मुसलमान तरुणी हिंदु प्रियकरासाठी धर्म पालटते, तर मुसलमान लगेचच ठार मारण्याची धमकी देतात आणि काही वेळेत तशी कृतीही करतात, याविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला ! – युनेस्को

स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !

भारत-फ्रान्‍स संरक्षण करारामध्‍ये पुन्‍हा एकदा ‘राफेल’ लढाऊ विमानच का ?

‘भारत-फ्रान्‍स संरक्षण करार हा भारतासाठी कुटनीतीच्‍या दृष्‍टीने पुष्‍कळ महत्त्वाचा आहे. फ्रान्‍सचा राष्‍ट्रीय दिन ‘बेस्‍टील’ हा १४ जुलै या दिवशी असतो. १४ जुलै १७८९ या दिवशी फ्रान्‍समध्‍ये झालेल्‍या ‘क्रांतीची आठवण’ म्‍हणून प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल विमानांच्या खरेदी करण्याचा करार !

ही विमाने भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार विशेषकरून बनवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग ! – अमेरिका

अमेरिका चीनला सर्वांत मोठा शत्रू मानते. अलीकडच्या काळात भारत काही प्रमाणात चीनच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबत आहे. त्यामुळेच एरव्ही भारताला पाण्यात पहाणारी अमेरिका अशी वक्तव्ये करून भारताला स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे !