पिंपरी-चिंडवडच्या (पुणे) सायबर विभागाकडून दिग्गज नेत्यांचे छायाचित्र, व्हिडिओ ‘मॉर्फ’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

दिग्गज नेत्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ ‘मॉर्फ’ करून ते ‘यू ट्यूब’वर प्रसारित करणार्‍या शमीम अन्सारी याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर विभागाने अटक केली आहे. शमीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडिओ अश्लील स्वरूपात ‘मॉर्फ’ केले होते.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे बनावट टि्‌वटर खाते बनवून भामट्याने पैसे उकळले !

महाराष्‍ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्‍या नावाने टि्‌वटरवर बनावट खाते उघडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्‍यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्‍यकता असल्‍याची ‘पोस्‍ट’ टाकली.

सायबर सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कराड येथील कापड दुकानदारांची १ लाख २५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

येथील बाजारपेठेतील कापड दुकानदारांची भाग्यनगर (हैद्राबाद) येथील युवकाने १ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी शहेनशहा शरीफ शेख यांना अटक केली असून कापड व्यापारी अभिषेक जैन यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली होती.

देवरुख येथील तरुणाची २ लाख रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक !

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक झाल्याची तक्रार  अलोक प्रमोद नलावडे याने केली आहे.

पथकर नाक्यावरून वाहन नेलेले नसतांनाही ‘फास्टॅग’च्या खात्यामधून रक्कम वजा झाली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा !

या माध्यमातून गुन्हेगार एखादे गुन्हेगारी कृत्य करून आपण पोलिसांच्या कचाट्यात नाहक गोवले जाऊ शकतो.

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएमचा पिन’,‘ओटीपी’ यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी.

देशात वर्ष २०१७ ते २०२१ या वर्षांत १ लाख ९६ सहस्र सायबर गुन्हे

भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !

श्री स्वामी समर्थ भक्तांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक !

भक्तनिवास नोंदणीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. मागील एक मासामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे.

तेलंगाणामध्ये अश्‍लील गाण्यात हिंदूंच्या मंत्रजपाचा वापर केल्यावरून गायकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !