अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे.

कपाळावर त्रिपुंड लावल्याने विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले!

जर शाळा-महाविद्यालये येथे कुणी टिळा लावला, तर त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर हिंदु धर्मातील परंपरा जाणीवपूर्वक नष्ट करण्याचेच हे षड्यंत्र आहे, असेच म्हणावे लागेल !

पुणे येथे नदीपात्रात राडारोडा टाकल्‍याच्‍या प्रकरणी तिघांवर गुन्‍हा नोंद !

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी त्‍यांच्‍या जवळील २ ‘टेम्‍पो’ आणि १ ‘ट्रॅक्‍टर’ यांच्‍या साहाय्‍याने पिंपळे गुरव येथे पवना नदी पात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकला. नदीचे पाणी प्रदूषित करण्‍याची कृती केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटके गोव्याला नेत असल्याचा फोन

टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे नामक व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे केला होता. हा टँकर कह्यात घेतल्यानंतर पुढील अन्वेषणासाठी तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

पॅरोलवर फरार असणारा गोध्रा हत्याकांडातील दोषी सत्तार याला पोलिसांनी केली अटक !

पॅरोलवर असणारा दोषी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक कशी काय करतो ? यासाठी उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना २ कोटी रुपयांचा दंड !

मानहानीच्या प्रकरणात २२ वर्षांनंतर न्याय मिळणे, याचा अर्थ ‘इतकी वर्षे व्यक्तीची मानहानी होत रहाणे’, असाच होतो, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

जिल्हा न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याचा आधार घेतला आहे.

 महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

एरव्ही हिंदूंच्या साधू-संतांवर केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांवरून आकाशपाताळ एक करून हिंदु धर्मावरच चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच विध्वंसक कारवायांसाठी वापरण्यात येणारी पावडर जप्त !

‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे चित्रीकरणात नेमके काय आहे ?’, ‘पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केले आहे ?’, ‘यात पुण्याच्या बाहेरचे चित्रीकरण केले आहे का ?’, आदींचे अन्वेषण पोलीस करत आहेत.