ठाणे येथील भ्रमणध्वनी चोरीविरोधी पथकाने १९ भ्रमणभाष चोरांना केले कह्यात

ठाणे पोलिसांच्या भ्रमणध्वनी चोरीविरोधी पथकाने कल्याण आणि उल्हासनगर येथील १९ आरोपींना कह्यात घेत चोरीला गेलेले १८६ भ्रमणभाष शोधून काढले आहेत

ठाण्यातील ५ मजली अनधिकृत लॉज आणि मद्यालय यांवर कारवाई

येथील अनधिकृत मद्यालये, लॉज, हुक्का पार्लर यांवरील कारवाईमध्ये तिसर्‍या दिवशी सिनेवंडर मॉल येथील आयकॉन लेडीज बार सीलबंद करण्यात आले, तर घोडबंदर रोड येथील काव्या इमारतीतील ५ मजली अनधिकृत लॉज तोडण्याची कारवाई करण्यात आली.

दाऊद टोळीला आर्थिक रसद पुरवणार्‍या बोरिवली येथील मटका व्यावसायिकाला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

कुख्यात गुंड दाऊद टोळीला आर्थिक रसद पुरवणार्‍या बोरिवली येथील मटका व्यावसायिक पंकज गंगार याला पोलिसांनी २७ सप्टेंबरला कह्यात घेतले. त्याला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

थायलंड येथून आयात केलेल्या चपलांमधून ११ कोटी ४० लक्ष रुपयांचे सोने जप्त

डोंगरी येथील अल रहमान इम्पेक्स या आस्थापनाने महिलांसाठी थायलंड येथून आयात केलेल्या चपलांच्या कंटेनरमधून कस्टम अधिकार्‍यांनी २१ सप्टेंबर या दिवशी सोन्याची ३८ किलो वजनाची ३८ बिस्किटे (बार) जप्त केली.

मिरजेत रखवालदाराची हत्या : एटीएम् फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

मिरजेत काही अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम् यंत्र फोडण्याच्या उद्देशाने रखवालदार राजाराम कृष्णा जाधव यांची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी जाधव यांच्या डोक्यात काठीने वार केला.

हिंदी चित्रपटांतून गुंडांचे उदात्तीकरण !

हिंदी चित्रपटातील बरेच दिग्दर्शक किंवा निर्माते यांना गुन्हेगारी जगताविषयी प्रचंड आकर्षण असते. त्यांचे बर्‍याच प्रकारचे हितसंबंधही त्यांच्यात गुंतलेले असतात. यांच्या प्रभावामुळेच ते सतत काही काळाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले चित्रपट घेऊन येत असतात.

महामना एक्सप्रेसमधील नळ तसेच अन्य साहित्य यांची पहिल्याच दिवशी चोरी

विकासाच्या नावाखाली जनतेला सुखसुविधा उपलब्ध करण्यासमवेत नैतिकतेचे धडे दिले असते, तर आज ही वेळ आली नसती ! मुंबई – चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या महामना एक्सप्रेसमध्ये पहिल्याच दिवशी चोरी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले नळ, शॉवर तसेच २ पायर्‍याही चोरून नेल्याचे लक्षात आले आहे. १. वाराणसी ते वडोदरा या रेल्वे स्थानकांमध्ये चालणारी … Read more

वर्धा येथील पंजाबराव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेची ९ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या ३५ जणांवर गुन्हे प्रविष्ट

येथील पंजाबराव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३५ जणांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्याविरुद्ध मटकाप्रकरणी गुन्हा प्रविष्ट

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मटक्याशी निगडीत साहित्य मिळाल्याने ‘गोवा गॅम्बलींग’ कायद्याखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

डोंबिवली येथे अपहरणकर्ता मनोरुग्ण असल्याचे सांगून तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ

येथे तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा एका व्यसनी तरुणाने केलेला प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला; मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या व्यसनी तरुणावर कारवाई न करता त्याला फ्राईड राईस खाण्यास दिला.


Multi Language |Offline reading | PDF