देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे लज्जास्पद !

देहली येथील कैलाश विहार पंसारी भागात शिवशक्ती मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पुदुचेरी येथे धर्मांधाने मंदिरात घुसून शिवीगाळ करत केले ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे किती महत्त्वाचे झाले आहे, हे लक्षात येते ! आतापर्यंत रात्री गुपचूप मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची तोडफोड होत होती, आता थेट मंदिरात घुसून शिवीगाळ केली जात आहे, उद्या तोडफोड करण्याचे धाडस झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगून फसवणूक

तरुणीचे लैंगिक शोषण करत गर्भवती केल्यानंतर मारहाणीमुळे गर्भपात ! सातत्याने अशा घटना देशात घडत असतांना एकही मुसलमान नेता, मौलवी, मुसलमान संघटना पुढे येऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

स्वप्नील वाळके खून प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र प्रविष्ट

गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक सी. एल्. पाटील यांनी २ सप्टेंबर २०२० या दिवशी झालेल्या स्वप्नील वाळके खून प्रकरणातील ६ आरोपींविरुद्ध मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

पाकसाठी हेरगिरी करणारा सैनिक प्रकाश काळे याला अटक

पाकसाठी हेरगिरी करणारा सीमा सुरक्षा दलाचा सैनिक प्रकाश काळे याला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातील नगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे.

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या कुटुंबाकडून धर्मांतरासाठी छळ ! – वाजिद खान यांच्या पारशी पत्नीचा आरोप

स्वतःला निधर्मीवादी म्हणवून घेणारी हिंदी चित्रपटसृष्टी आता एका धर्मांध कुटुंबाच्या छळाने पीडित अल्पसंख्यांक पारशी महिलेच्या मागे उभी रहाणार का कि त्यांचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देणार ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिकमधील एक सैनिक हुतात्मा, तर १० जण घायाळ

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.

कुडाळ तहसीलदारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा वाळूमाफियांवर गुन्हा नोंद 

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असतांना २८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ वाजता तालुक्यातील आंदुर्ले खिंड येथे वाळूमाफियांनी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.