‘फोन टॅपिंग’च्या सूत्रावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

राज्यातील पोलिसांच्या स्थानांतरामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा वर्ष २०२० मध्ये गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला होता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शासनच करायला हवे !

बावळाट येथे १० लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

पोलिसांनी ट्रक आणि चालक रवींद्र रामकिशन याला कह्यात घेतले.

सावंतवाडी येथे अज्ञाताकडून ४ चारचाकी गाड्यांची तोडफोड

एका अज्ञात दुचाकीस्वाराने गाड्यांची तोडफोड केल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

खाण घोटाळ्याच्या प्रकरणी खाणमालकांकडून पैसे वसूल करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची स्तुत्य घोषणा !

संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही ? याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा ! – मुंबई उच्च न्यायालय

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

रेठरे बुद्रुक सोसायटीच्या खत विभागात २३ लाख रुपयांचा अपहार !

तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी नीतीवान समाज निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण द्यायला हवे !

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे नोंद !

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही भाजपने संबंधित आदेशाचे पालन न करत आंदोलन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

शासकीय गाड्यांचा अपवापर करणार्‍यांवर कारवाई करा ! – सुरेश बापर्डेकर, तारकर्ली, मालवण

सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ?