धारावी (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पकडून दिलेले गोवंशियांचे मांस पोलीस संरक्षणातून गायब !

‘पोलिसांचे कर्तव्य हिंदुत्वनिष्ठांनी पार पाडले असतांनाही मांस गायब करण्याचा प्रकार हा गोहत्या करणार्‍यांना वाचवण्यासाठी आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? धर्मांध कसाई आणि गोतस्कर यांच्याशी साटेलोटे असलेले पोलीस गोहत्या काय रोखणार ?

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.

झारखंड पोलिसांच्या हातमिळवणीतून होते बांगलादेशमध्ये गोवंशांची तस्करी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !

गोवंशियांची अनधिकृत वाहतूक : आरोपीला न्यायालयीन कोठडी

गोवंशियांची वारंवार होणारी अवैध वाहतूक, हा संबंधित आरोपींवर ठोस कारवाई न केल्याचा परिणाम !

गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्‍यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !

वरवंड (पुणे) येथे गोरक्षकांनी वाचवले १६ गोवंशियांचे प्राण !

कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते !

फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे ‘अखिल भारतीय संत समिती’कडून गोवंश रक्षणासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन !

पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !