वाशिम येथे कत्तलीसाठी नेणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाखांचा ऐवज जप्‍त !

वाशिम येथून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाख रुपयांचा माल स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने १८ जून या दिवशी जप्‍त केला आहे. या प्रकरणी १४ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून ६ जणांना कह्यात घेतले आहे.

कर्नाटक सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताच पाठ्यपुस्तकांतून वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारगुरुजी यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच धर्मांतरविरोधी कायदा मागे घेण्याची घोषणा केली.

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच गोहत्या संपूर्णपणे थांबतील !  – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय, मुंबई

भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात.

दौंड (पुणे) येथे पशूवधगृहावर टाकलेल्‍या धाडीत १६ गोवंश आणि चरबीपासून सिद्ध केलेले बनावट तूप जप्‍त !

ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील पशूवधगृहाशेजारी जनावरे, गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती १० जून या दिवशी प्राणिमित्रांना मिळाली. त्‍यांनी पुणे जिल्‍हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली

इगतपुरी येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या ३ जणांना मारहाण

पोलीस गोवंशियांची वाहतूक रोखू शकत नसल्‍यामुळे गोप्रेमींना गोवंशियांची अवैध वहातूक रोखावी लागते ! हे पोलिसांचे अपयशच आहे ! पोलीस त्‍यांचे कर्तव्‍य कधी बजावणार ?

दौंड शहरातून २ सहस्र ४२८ किलो गोमांस जप्त; ३ धर्मांधांसह एकाला अटक !

गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न होण्याचा परिणाम ! आतातरी गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा होणार का ?

कर्नाटकात गोहत्या आणि हिजाब विरोधी कायदे मागे घेतले जातील ! – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खड्गे

हिंदुद्रोही काँग्रेसला मत दिल्याचे फळ आता तेथील हिंदूंनी भोगणे क्रमप्राप्त आहे !

२५० किलो गोमांसाची अवैध वाहतूक केल्‍याच्‍या प्रकरणी यवत (जिल्‍हा पुणे) येथे ६ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

दौंड येथील पशूवधगृहातून पुणे येथे ४ जून या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्‍याची बातमी गोरक्षा दल महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गोरक्षकांना मिळाली होती. त्‍यानुसार ही गाडी पकडण्‍यासाठी मानद पशूकल्‍याण अधिकारी ऋषिकेश कामथे, गोरक्षक अक्षय कांचन, राहुल कदम, प्रतीक कांचन, विशाल राऊत हे उरळी कांचन येथील मुख्‍य चौकात पहार्‍यासाठी थांबले होते.

नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – प्रल्‍हाद सिंह पटेल

पटेल यांनी सोनगाव येथील सोनेश्‍वराचे दर्शन घेतले, तसेच नीरा नदीची पहाणी केली. या वेळी नदीची सगळ्‍यात अधिक हानी पशूवधगृहामुळे झाली आहे. नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी त्‍यांनी प्रदूषण करणार्‍यांना दिली आहे.

(म्हणे) ‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

भारतातील प्रत्येक हिंदूला गायीचे महत्त्व ठाऊक आहे आणि गायीविषयीच्या भावनाही; मात्र व्यंकटेश जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी असे विधान करत आहेत ! कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना त्यांची चूक लक्षात येईल का ?