राजस्थानमध्ये स्थानांतर करून घेण्यासाठी सरकारी शिक्षकांना द्यावी लागते लाच !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रश्‍नावर शिक्षकांनी दिली स्वीकृती !

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अडीच सहस्र ठेवीदारांच्या ४९ कोटी रुपयांच्या ठेवीचे वितरण !

रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.

जालना येथे वक्फ मंडळाच्या भूमीची परस्पर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद !

अपहार रोखण्यासाठी सरकारने वक्फ मंडळाच्या सर्व व्यवहारांची चौकशी करावी, तसेच वक्फ मंडळाला देण्यात येणारे सर्व अनुदान त्वरित बंद करावे !

महापालिकेचे आरोग्य निरीक्षक ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

तक्रारदार यांचा वैयक्तिक टेम्पो असून कचरा उचलून येरवडा कचरा डेपोत टाकण्यासाठी आणि टेम्पोचे काम चालू ठेवण्यासाठी कोठावळे यांनी प्रतिमास ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भ्रष्टाचारात गुंग असल्याने जिल्हा परिषदेचा ४३ कोटी रुपयांचा विकासनिधी परत गेला ! – हरि खोबरेकर, सदस्य, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व असलेली जिल्हा परिषद अकार्यक्षम असल्याचा आरोप

१ लाख रुपयांची लाच घेणारा नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी अटकेत !

सत्र न्यायालयाने आरोपीला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

राफेल विमान खरेदीमध्ये मध्यस्थाला देण्यात आले ६५ कोटी रुपये ! – फ्रान्समधील वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’चा दावा

कागदपत्रे असतांनाही सीबीआयने चौकशी केली नसल्याचा आरोप !

लाचप्रकरणी खासगी व्यक्तीवरही कारवाई करता येणार !

लाच स्वीकारण्याच्या विविध प्रकरणांमध्ये खासगी मध्यस्थ म्हणून आढळून येतात. आता नवीन नियमानुसार खासगी व्यक्तीवरही लाच प्रकरणी कारवाई करता येणार आहे.

धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी पापाचे धनी होत आहेत’, हे त्यांना कळले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर ते पापाचे धनी होणार हे निश्‍चित !’