‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !

पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्‍या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.

लुटीचा ‘साम्यवादी’ मार्ग !

केरळचे मत्स्योत्पादनमंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी पिनराई विजयन् सरकारने ४ लाख १० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ‘चेरियन यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ७ मासांच्या कार्यकाळात काय जनताभिमुख कारभार केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे.

ग्रामपंचायतीमधील भरती प्रक्रियेत दोषी आढळलेले १६ अधिकारी निलंबित ! – आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

भ्रष्टाचाराची ही कीड मुळापासूनच नष्ट व्हायला हवी. केवळ निलंबन नको, तर बडतर्फ आणि कठोर शिक्षाच हवी !

परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळणे थांबवा !

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उत्तीर्ण होणेच आवश्यक आहे. असे विद्यार्थीच देशाचे भवितव्य घडवू शकतात. अन्यथा पुढे हेच विद्यार्थी देशासाठी घातक होतात, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

आश्वासन देऊनही अभियांत्रिकीची बनावट पदविका घेतलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी चालू केली नाही ! – आम आदमी पक्षाचा आरोप

मान्यता नसलेल्या संस्थांमधून अभियांत्रिकीची बनावट पदविका मिळवून काही कर्मचार्‍यांनी महापालिकेत पदोन्नती मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आश्वासन देऊनही प्रशासनाने चौकशी चालू केली नाही.

वाई (जिल्हा सातारा) येथील उपकोषागारातील अधिकार्‍यास लाच घेतांना पकडले !

तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्‍यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे.

लोकशाही स्थिर करण्यासाठी पैशांचा अपवापर थांबवा !

‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल.

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्याच्या प्रकरणी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

‘आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेत ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या नैतिकतेला धरून नाहीत. यामध्ये पालट करणे आवश्यक आहे. ही परिस्थिती कलियुग असल्याचे द्योतक आहे. कुंपणच शेत खात आहे’, हे आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले.

अमरावती हिंसाचार प्रकरणी विधानसभेत आवाज उठवला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ! महाराष्ट्रात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’चे राज्य आहे !

राजकीय शुद्धतेसाठी पुढार्‍यांवरील खटल्यांची सुनावणी वर्षभरात पूर्ण करण्यात यावी !

अशी मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे. खून, दरोडे यांसारखे गंभीर आरोप असलेले लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ?