२७ मे या दिवशी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे शतक पार

२७ मे या दिवशी महाराष्ट्रात कोरोनाचे २ सहस्र १९० नवीन रुग्ण आढळले, तर १०५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १ सहस्र ८९७, तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६ सहस्र ९४८ इतकी झाली आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतरच प्रार्थनास्थळे उघडण्यात येतील ! – कर्नाटक सरकारचे घुमजाव

कर्नाटक सरकारने ३१ मे नंतर राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी आणि चर्च उघडण्याची घोषणा केली होती; मात्र अवघ्या काही घंट्यांतच सरकारने कोलांटउडी घेत पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा केली.

देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत असतांना कशाच्या आधारावर पाठ थोपटून घेत आहेत ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा नाहीत, रुग्णवाहिन्यांविना रस्त्यावर मृत्यू होत आहेत. मुंबईत कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्याचे सांगितले; मात्र चाचण्या होत नाहीत. आज संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्ण ५ टक्के असतांना महाराष्ट्रात मेमध्ये ३५ टक्के रुग्ण आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आभासी होती ! – अनिल परब, परिवहनमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आभासी होती. महाराष्ट्र सरकारला २०१९-२० या वर्षाचे हक्काचे १८ सहस्र कोटी रुपये मिळालेले नाहीत. फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे १७५० कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही.

जूनच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठू शकते ! – डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

शहरातील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १ मासावरून १४ दिवसांवर पोचला. वाढलेल्या चाचण्या आणि दळणवळण बंदी काही प्रमाणात शिथिल केल्याने रुग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

‘रेडझोन’मधून आलेल्या नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका !

मुंबई, पुणे आणि जिल्ह्याबाहेरील भागांतून लांजा तालुक्यात येणार्‍या नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी देवधे (लांजा) येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या कार्यालयातील अध्ययन कक्ष प्रशासनाने कह्यात घेतले आहेत.

राज्य राखीव पोलीस दलातील १४ जणांना ‘कोरोना’ची लागण

मुंबईतील घाटकोपर येथे बंदोबस्ताला गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील ‘सी कंपनी’च्या १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना महापालिकेच्या ‘क्वारंटाइन सेंटर’मध्ये ठेवले आहे. या ‘कंपनी’तील १०० पोलिसांची तुकडी मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती.

ठाणे येथील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये २ विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती

प्रतिबंधित क्षेत्रांच्या परिसरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे येथे दीपक देवराज, तर वागळे इस्टेट येथे संजय जाधव या २ अतिरिक्त पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या परिमंडळातील अनुमाने २५० प्रतिबंधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.

शहापूर येथील अलगीकरण केंद्रांमध्ये सीसीटिव्ही बसवावेत ! – महेश धानके, तालुका अध्यक्ष, काँग्रेस

शहापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे दहागाव आश्रमशाळा आणि जोंधळे महाविद्यालय येथे अलगीकरण करण्यात येते.

कोरोनाबाधित नसलेल्यांना कामासाठी गोवा राज्यात जाण्यास २४ घंट्यांत प्रवेश मिळणार

ज्या व्यक्तीला गोव्यात कामासाठी जायचे आहे, त्याने जेथे कोरोनाविषयीची तपासणी होते, तेथे ती करावी आणि त्याचा अहवाल नकारात्मक आल्यास गोवा सरकार २४ घंट्यांच्या आत त्या व्यक्तीला राज्यात प्रवेश करण्याची अनुमती देईल.