कौशल्यविकासाला संधी !

कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद असल्याने सर्वजण घरीच आहेत. दळणवळण बंदीमुळे बाहेर जाता येत नसल्याने अनेक जणांना या मोकळ्या वेळेत काय करायचे ?…

केरळमध्ये चहा वेळेत न दिल्याने कोरोनाबाधिताकडून परिचारिकेला मारहाण

कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट १ किंवा २ डझन आंबा विक्रीचा प्रयोग करणार ! – भाजपचे माजी आमदार बाळ माने

हवामानातील पालट, अतीवृष्टी आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. त्यापाठोपाठ कोरोना विषाणूचे जागतिक संकट उभे राहिले आहेे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

व्यापार-उद्योगाला २ लाख कोटींचा फटका

कोरोनामुळे देशांतर्गत बहुतांश उद्योग-व्यवसायातील उलाढाल ४० टक्क्यांनी थंडावल्याने देशातील उद्योग-व्यवसायांची अनुमाने २ लाख कोटी रुपयांची हानी झाल्याचे अनुमान ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (फिक्की) या शिखर व्यापारी संस्थेने काढले आहेत….

पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील आक्रमणाच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी आक्रमणे करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगून एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला

‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.

जुना राजवाडा (कोल्हापूर) येथील ऐतिहासिक नगारखान्याला या वर्षी २५ फुटी साखरेची माळी नाही ! 

हिंदु नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करून, नव्या संकल्पना, संकल्प करून मोठ्या उत्साहात केले जाते. यंदा कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत….

रत्नागिरी जिल्ह्यात ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’

जिल्ह्यात एकूण ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करून घरी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ अंतर्गत जिल्ह्यात दळणवळण बंदीची कार्यवाही चालू आहे.

रत्नागिरीत ३४ पैकी २१ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत ३४ पैकी २१ संशयित रुग्णांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरीच्या वतीने पोलिसांना पाणी वाटप

कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.