माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री दत्तजयंती निमित्त २९ आणि ३० डिसेंबरला देवगडकडे (जिल्हा नगर) जाणारे रस्ते बंद रहाणार !

दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाचा विषाणू किमान १० वर्षे तरी जाणार नाही ! – बायोटेक आस्थापन

पुढील १० वर्षेतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासमवेतच रहाणार आहे, असे विधान बायोटेक आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन यांनी केले आहे. कोरोनाविषयी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता.

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

‘ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीच्या आमदारांचा या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी हेतू मात्र राजकीय आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरातील दर्शन पुन्हा बंद

२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी