८ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीच्या विरोधात आघाडीवर लढणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लसीकरण मोहीम

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ७ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.

नाठाळाचे माथी हाणू काठी ।

येणार्‍या काळात यशस्वी होण्यासाठी भारताला साहाय्य करणार्‍या भूमिकेसमवेतच कृष्णनीतीचे शस्त्रही वापरावे लागणार आहे. यातूनच भारत तावून सुलाखून बाहेर पडून हिंदु राष्ट्राची उज्ज्वल पहाट पाहू शकेल, हे लक्षात घ्या !

भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले ! – जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले, तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे

राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.

१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येतील ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

सातारा पालिका प्रशासन मढ्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे ! – नगरसेवक अण्णा लेवे

कोरोना आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली नगरपालिकेने मनाला वाटेल तसे साहित्य खरेदी केले आहे. ५०० मास्क खरेदीचे वाटप झालेच नाही. कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले, गुरूंवरची श्रद्धा वाढवली. कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून मनाची सिद्धता करवून घेतली.

कोरोनापेक्षाही अधिक धोकायदायक ‘कॅण्डीडा ऑरिस’ बुरशीची साथ येऊ शकते ! – वैज्ञानिकांची चेतावणी

जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करणार !

मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्‍यांसाठी लाजिरवाणे आहे !