कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू

होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.

शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोनाबाधित : सर्व मंत्री आणि आमदार यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक

कोरोनाबाधित आमदार बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे.

देशात आतापर्यंत १ लाख ६१ सहस्र लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्या संदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे; मात्र जनतेकडून विविध कारणांमुळे त्याचे उल्लंघन केले जात आहे. याला जनतेप्रमणेच त्यांना शिस्त न लावणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

पाकच्या उद्योगपतीने त्याच्या कर्मचार्‍यांना दिली बनावट कोरोना प्रतिबंधात्मक लस 

पाकमधील उद्योगपती महंमद युसूफ अमदानी यांनी मेक्सिको येथील केम्पेश या शहरातील त्यांच्या कापडाच्या मिलमधील १ सहस्र कर्मचार्‍यांना कोरोनाची बनावट लस दिली. ‘रिफॉर्मा‘ नावाच्या वृत्तपत्रात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांत अंशत: संचारबंदी !

महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून कार्यवाही चालू झाली आहे.

हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होईल ! – बिल गेट्स

वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर येईल, असे विधान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि ‘टीव्हीएन् २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना ! ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन.

दाणोली येथील प.पू. साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा होणार

प.पू. साटम महाराज सोहळ्याला भाविकांनी गर्दी न करता ज्या ठिकाणी असाल तेथूनच श्री समर्थ साटम महाराज यांना नमस्कार करावा