सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण

जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

कोविड महामारीमुळे लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये ७० टक्के वाढ ! – सुषमा मांद्रेकर, अध्यक्ष, गोवा बाल हक्क आयोग

कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.

विनामास्क फिरणार्‍यांवर मालवण नगरपरिषदेची कारवाई

मालवण नगर परिषदेकडून  शहरात कोरोनाविषयक नियमांची काटेकोर कार्यवाही करतांना गेले काही मास विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत मागील  १० दिवसांत १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शिक्षक आणि एस्.टी.चे कर्मचारी यांची कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यास प्रारंभ

इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास, तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एस्.टी.ची सेवा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे एस्.टी.चे कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या कोरोनाशी संबधित चाचण्या जिल्हा अन् तालुका या स्तरांवर चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधुदुर्गात २४ घंट्यांत १२ नवीन कोरोनाबाधित

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ११५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८०९ आहे.

२६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार

देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने खासगी जागेत साजरी करावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.