१ मे नंतर होणार्‍या प्रत्येक मृत्यूस राज्य सरकार जबाबदार ! – डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार, भाजप  

आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने लस घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला तातडीने विनामूल्य लस द्यावी.

स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह देऊ नयेत !

राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत, याची मुंबई उच्च न्यायलयाने नोंद घेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह देऊ नयेत, अशी सूचना सरकारला केली आहे.

कोरोनामय आयपीएल् !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्‍यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्‍यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.

कोविड नियमांचे उल्लंघन करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम !

भाजपच्या वतीने शहरातील कोरोना रुग्णालयांना भेटी देणे आणि कोविड केअर सेंटरचे उद्घाटन हे कार्यक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

एक वर्षातील ३६६ आमदारांचा निधी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व्यय (खर्च) करा !

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. या गंभीर परिस्थितीला आरोग्य विभाग सामर्थ्याने लढा देत असला, तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा देतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करणे आवश्यक आहे.

आता पुण्यात कोरोना रुग्णांचे होणार ‘ऑडिट’ !

कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. या स्थितीत अनेक रुग्णांना वेळेत बेड न मिळणे, उपचार न होणे यांमुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा एक नवा प्रयोग महापालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा !- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉप्स विद्यार्थी संघटनेची मागणी !

दहावीच्या परीक्षा रहित झाल्याने पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन, भरारी पथकांचा व्यय आदी व्यय होणार नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉप्स विद्यार्थी संघटना यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे

कोरोनावरील लसीच्या निर्मितीसाठी राज्यशासनाकडून हाफकिनला मान्यता !

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प चालू करण्यास राज्यशासनाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ या आस्थापनाकडून केंद्रशासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने ……

कोरोनामध्ये दूध चालते का ?

मग दूध कोरोनामध्ये का नको ? मुळातच दूध आणि तत्सम पचण्यास जड पदार्थ हे कोरोनाच काय, तर कुठल्याही तापात चालत नाहीत (काही अपवाद वगळता). कारण तापात आपला अग्नी म्हणजे पचन शक्ती ही मंद पडलेली असते.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्यामुळे अभिनेते जिमी शेरगिल यांना अटक

कोरोना नियमांचे उल्लंघन करून चित्रपटाचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेते जिमी शेरगिल यांना अटक करण्यात आली. सामाजिक सुरक्षिततेचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.