कोरोनाचे संकट असतांना १ मार्चपासून आमदारांचे वेतन पूर्ववत् !

आमदारांचा निधी ४ कोटी रुपये केला ! – अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, राज्य आर्थिक संकटात असतांना लोकप्रतिनिधींचे वेतन वाढवणे कितपत योग्य ?

गोवा मनोरंजन संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प आता जनतेसाठी खुला

कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.

गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्‍यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडून साधूसंतांना लसीकरण करण्याची सरकारकडे मागणी !

कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून आधारकार्ड आणि शिधापत्रिका घेण्यात येत आहेत

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याचा निर्णय !

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

महागाव जिल्हा सातारा येथील मातोश्री वृद्धाश्रमात १९ जण कोरोनाबाधित

सातारा, १० मार्च (वार्ता.) – येथील महागावस्थित मातोश्री वृद्धाश्रमात १९ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांवर तात्काळ उपचार चालू करण्यात आले असून एका वृद्धाला सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच महागाव ग्रामपंचायतीला आश्रम सँनिटाईझ करायला सांगितले आहे, अशी माहिती चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली. … Read more

कोरोनाबाधित रुग्णांची अपुरी माहिती पाठवणार्‍या खासगी प्रयोगशाळांना टाळे !

अशा कामचुकार आणि हलगर्जीपणा करणार्‍या प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करायला हवी ! पुणे – कोरोनाबाधित असणार्‍या रुग्णांची अपुरी माहिती पाठवणार्‍या ३ खासगी प्रयोगशाळांना पुणे महापालिकेने टाळे ठोकले आहेत. यामध्ये क्रस्ना लॅब, मेट्रोपोलीस लॅब आणि सब अर्बन डायग्नोस्टिक सेंटर या प्रयोगशाळांचा समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोरोनाची चाचणी करू नका, अशी सूचना या प्रयोगशाळांना दिली आहे. कोरोनाबाधित … Read more

भारत पाकिस्तानला देणार साडेचार कोटी कोरोना लसीचे डोस

‘द ग्लोबल अलायंस फॉर वैक्सीन अँड इम्यूनायजेशन (जीएव्हीआय) या संघटेच्या अंतर्गत भारत पाकिस्तानला कोरोना लसीचे ४ कोटी ५० लाख डोस देणार आहे.

भारताने जगाला कोरोनातून वाचवले ! – अमेरिकेच्या ज्येष्ठ वैज्ञानिकांचे गौरवोद्गार

‘एम्.आर्.एन्.ए.’ (अमेरिकेने सर्वप्रथम कोरोनावर काढलेली लस) लसींचा परिणाम जगातील गरिब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होत नाही; मात्र भारताच्या लसीने जगाला वाचवले आहे.