मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाची माहिती दिली. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गोंधळ. ८ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित.
फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाची माहिती दिली. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गोंधळ. ८ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित.
मराठा आरक्षणाविषयी विधान परिषदेत सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?
गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची रवींद्र भवन, मडगाव आणि कला अकादमी, पणजी अशी दोन्ही ठिकाणी ७ मार्चला जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणी जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी गदारोळ घातला
‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता.
हनुमानगड (राजस्थान) येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले.
राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.
गुजरातमधील गोध्रा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय संबंध ? मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षा पुरवण्याचे काम केले.
जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षली आरोपींना नजरकैद दिल्यानंतर गदारोळ झाला होता, तो योग्यच होता. हेच सर्वोच्च न्यायालयाचा आंध्रप्रदेश सरकारविरुद्धच्या खटल्याचा निवाडा आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा निवाडा यांवरून सिद्ध होते. नजरकैद ही फौजदारी निगराणी संहितेतील व्याख्येत कुठेही बसत नाही.
सनातनवर बंदीची मागणी करणारे तथाकथित निधर्मीवादी आता आय.एस्.एफ्. या धर्मांधांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि ‘धर्मांधांनी बॉम्ब बाळगणे’, ‘त्याचा वापर करणे योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?