भारतीय ‘युनीकॉर्न’ आस्थापनांच्या संख्येत कमालीची घट !

चीनमध्ये १ सहस्त्र युनीकॉर्न आस्थापने असून एका अनुमानानुसार भारतात पुढील ५ वर्षांत २०० आस्थापने हा दर्जा प्राप्त करतील.

चीनपेक्षा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अधिक रहाणार !

भारतासह व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांचेही सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ६ टक्के रहाणार आहे. 

मणीपूरमधील हिंसाचार करणार्‍यांकडून बंदी असलेल्या चिनी दुचाक्यांचा सर्रास वापर !

एका राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गाडीचा सर्रास वापर होतो, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

जपानमध्ये आकाशात दिसले हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे चिनी फुगे !

धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अणूबाँब डागण्याच्या तोफा तैनात !

‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन भारताने पाकला लक्षात राहील, असे आक्रमण त्याच्यावर करणे आवश्यक आहे !

‘जी-२०’ची काश्‍मीरमधील बैठक आणि पाकिस्‍तान अन् चीन यांना दिलेली चपराक !

‘जी-२० मध्‍ये सध्‍या १९ देश आणि युरोपीय महासंघ असे सदस्‍य देश आहेत. श्रीनगरमधील बैठकीला यांपैकी एकूण १६ देश आणि युरोपीय महासंघ उपस्‍थित राहिले. ‘जी-२०’ संघटनेच्‍या कार्यगटांच्‍या जितक्‍या बैठका गेल्‍या काही काळात पार पडल्‍या आहेत, त्‍यांपेक्षा सर्वाधिक सदस्‍य श्रीनगरमधील बैठकीला उपस्‍थित होते.

संयुक्त राष्ट्रांत चीनकडून पुन्हा एकदा पाकिस्तानी आतंकवाद्याची पाठराखण !

साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !

भारताचे सडेतोड परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर !

बांगलादेशची राजधानी ढाका येथे मे मासात ६ वी ‘इंडियन ओशियन कॉन्‍फरन्‍स’ म्‍हणजेच ‘हिंद महासागर परिषद’ पार पडली. या वेळी भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हेही उपस्‍थित होते. डॉ. जयशंकर यांनी चीनसह पाकिस्‍तानला चांगलेच धारेवर धरले.

पाकिस्तानशी व्यापार वाढवण्याची इच्छा ! – रशिया

जिहादी पाकला जगात एकटे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर चीन कशा प्रकारे विरजण घालत आहे, याचेच हे उदाहरण ! भारत ज्याला मित्र समजतो, तो रशियाही आता भारताला डिवचत आहे, हेच यावरून सिद्ध होते ! सरकार रशियाची कानउघाडणी करणार का ?

चीन आणि पाकिस्‍तान यांची भारतापेक्षा वेगाने अण्‍वस्‍त्र निर्मिती !

जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे आहेत. त्‍यांपैकी ९ सहस्‍त्र ५७६ अण्‍वस्‍त्रे ही आक्रमणास सज्‍ज आहेत. यांपैकी ३ सहस्‍त्र ८४४ अण्‍वस्‍त्रे ही क्षेपणास्‍त्रे आणि विमाने यांमध्‍ये बसवण्‍यात आली आहेत.