रामराज्यासाठी सर्वांनी समवेत येऊन कार्य करणे अपेक्षित आहे ! – श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज

सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी १ घंटा देऊन धर्मसेवा केली पाहिजे, असे मार्गदर्शन पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.

हिंदूंनी साधना करून आत्मबळ आणि धर्मबळ जागृत करावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्माचे शुद्ध स्वरूप जाणून घ्या. हिंदूंकडे संख्याबळ आणि बाहूबळ दोन्ही आहे; मात्र कार्य हे आत्मबळ आणि धर्मबळ यांच्या आधारावर होते. त्यामुळे सर्वांनी साधना करून आत्मबळ आणि धर्मबळ जागृत करावे

काठमांडू येथील ‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेला ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन

‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने मेगा विद्यालयामध्ये ‘चिंतन चौतारी’ हा नव्याने उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हिंदूंना जागृत करणे म्हणजे साधनेद्वारे त्यांच्यातील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणे होय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही सदस्य यांची भेट घेतली.

हरियाणात ठिकठिकाणी व्याख्याने आणि संपर्क यांद्वारे धर्मप्रेमींना साधनेविषयी, तसेच हिंदूंना धर्मबळ वाढवण्याविषयी मार्गदर्शन

धर्मशिक्षण नसल्याने आजचा हिंदु तरुण धर्माची बाजू मांडतांना शास्त्रशुद्ध विवेचन करू शकत नाही. आज लोक व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करतात; मात्र हिंदूंना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार नाही. घटनेत ‘सेक्युलर’ शब्द घालून खाण्याच्या, आचरणाच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे

रथसप्तमी आणि माघ पौर्णिमा या दिवशी सूर्याचे दर्शन होण्याच्या माध्यमातून श्रीमन्नारायणाच्या सगुणातील लीलांचा अनुभवलेला अवर्णनीय आनंद !

माघ पौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमात विशेष सोहळा असणे, त्याच्या आदल्या रात्री देहली येथे पाऊस येणे, दुसर्‍या दिवशी सकाळी आकाशात काळे ढग असणे; मात्र अंघोळ करून आल्यावर तळपत्या सूर्याचे दर्शन होणे

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही!

‘ज्याप्रमाणे चाणक्यांनी नंद राजाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत, त्याचप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही.’

राजकारण्यांनी समतेच्या नावाखाली हिंदु विरोधाला खतपाणी घातले ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

कायदा आणि राज्यघटना वाचली नाही, असे काही लोक संसदेत बसले आहेत. त्यांनी ‘समता’ या गोंडस नावाखाली देशात विषमता निर्माण केली आणि हिंदु विरोधाला खतपाणी घातले आहे. अल्पसंख्यांकांना विशेष सुविधा देऊन हिंदूंना दुय्यम नागरिक केेले आहे. हिंदूंचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.

ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणार्थ ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे जागरण करावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सध्या ब्राह्मण समाज संकटात आहे. जाती-जातींमध्ये विद्वेश करणारे ब्राह्मण समाजाला लक्ष्य करत आहेत. या संकटांचा प्रतिकार करायचा असेल, तर ब्राह्मण समाजाने स्वत: साधना करून स्वत:तील ब्राह्मतेज वाढवले पाहिजे. ब्राह्मतेज म्हणजे साधनेचे बळ होय, तसेच ब्राह्मणविरोधी प्रचार करणार्‍यांचे क्षात्रतेजाने धर्मशास्त्रीय खंडण केले पाहिजे………

‘रथसप्तमीच्या दिवशी गंगास्नान घडणे आणि त्याच दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे पूजन होणे’, हे ईश्‍वरी नियोजन !

‘१२.२.२०१९ या दिवशी पहाटे आम्ही (मी आणि श्री. चेतन राजहंस) प्रयाग येथील त्रिवेणी संगमावर गेलो होतो. तेथे आम्हाला ‘आपत्कालीन व्यवस्था आणि पाण्यातील प्रथमोपचार’ याविषयी माहिती देण्यासाठी एक धर्मप्रेमी भेटणार होते. ते २ – ३ दिवसांपासून आम्हाला वेळ देण्यासाठी प्रयत्न करत होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now