सीबीआयच्या उपअधीक्षकांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

‘सीबीआय’चे उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

झारखंडमधील न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषींना जन्मठेपेची शिक्षा

उत्तम आनंद हे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेले असतांना त्यांना आरोपींनी रिक्शाची धडक दिली होती. त्यांच्याकडील भ्रमणभाष संच हिसकावण्यासाठी ही धडक दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले !

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे ‘ऑगस्टावेस्टलँड’ आस्थापनाचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर डी.एच्.एफ्.एल्. घोटाळ्यात ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

देहली न्यायालयाच्या निलंबित महिला न्यायाधीश आणि त्यांचे पती यांच्या विरोधात गुन्हा नोंद

भ्रष्टाचार नाही, असे एकतरी क्षेत्र शिल्लक आहे का ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्तींचा नकार !

याचिकाकर्ते मुंबईचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी त्यांच्याविरोधात सरन्यायाधिशांकडे तक्रार केल्याने ते हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणात दिले आहेत.

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांच्या घरावर सीबीआयची धाड

बेहिशोबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचार आदी विविध प्रकरणांत अनेक राजकारण्यांच्या घरावर धाड टाकण्यात येते; मात्र त्यांचे पुढे काय होते ? ‘केवळ धाडी टाकणे पुरेसे नसून दोषींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत’, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘सर्व्हर’मधील फेरफारीच्या प्रकरणी सीबीआयकडून भारतात १८ ठिकाणी धाडी

याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सध्या चौकशी चालू आहे.

माफीचा साक्षीदार बनण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अर्ज !

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्या अर्जाला सशर्त संमती दिली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !

देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्‍या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.