परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव आणि पालखी सोहळा होणार असल्याची मिळालेली पूर्वसूचना !

मी जागृतावस्थेत असतांना मला आकाशमार्गे एक रथ येतांना दिसत होता. तो सुवर्ण रंगाचा रिकामा रथ एक देवदूत चालवत होता. मला रथाच्या बाजूला एक पालखी दिसत होती. पालखी घेऊन चालणारेही दोन देवदूतच होते. पालखी आणि रथ पृथ्वीवर आलेले पाहून मला ‘ही भगवंताची दैवी लीला आहे’, असे वाटले.

‘साधक कुठेही असले, तरीही गुरूंचे पूर्ण लक्ष साधकांकडे असतेच’, याची प्रचीती घेणारे नागपूर येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाभाऊ सप्तर्षि (वय ८८ वर्षे) !

‘जानेवारी २०२२ च्या आरंभापासून मला ‘सतत ढेकरा येणे आणि तोंडातून जोरात आवाज येणे’, असे त्रास होऊ लागले. माझ्यावर घरगुती उपचार चालू होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभल्यावर श्री. प्रदीप वाडकर यांचे मन उत्साही आणि आनंदी होणे

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला उत्साह जाणवून आनंद वाटला. मी त्यांच्याशी काहीही न बोलता केवळ त्यांच्या सत्संगाने माझ्या मनाला उत्साह जाणवला.

ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी ‘झुलोत्सव’ पहातांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ध्यानावस्थेत दिसून त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण रूपाचे दर्शन होणे

पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटेआजोबा (वय ९० वर्षे) यांचा संतसन्मान सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पुणे येथील श्री. रणजित काशीद आणि सौ. सोनाली काशीद यांना फोंडा (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील कार्यशाळेत आणि ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला आरंभ झाला. त्या वेळी पुणे येथील श्री. रणजित आणि सौ. सोनाली काशीद यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गुरुपौर्णिमेला श्री दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या पाद्यपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये श्री दत्तगुरूंचे तत्त्व कार्यरत होण्यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी श्री दत्तगुरूंचे रूप धारण करणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या युवा साधना शिबिराच्या वेळी चंद्रपूर येथील कु. अवंती नामदेव उरकुडे यांना आलेल्या अनुभूती

१. ‘शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवले. माझे नाम सतत चालू होते. २. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती २ अ. श्रीसत्‌शक्ति  (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी १. माझी भावजागृती झाली. २. ‘वातावरणातील प्रकाश पुष्कळ वाढला आहे’, असे मला जाणवले, तसेच सगळीकडे चैतन्य जाणवत होते. ३. शिबिरात श्रीसत्‌शक्ति  (सौ.) … Read more

‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.