मेरा भारत महान !

‘विश्‍वात प्रतिवर्षी होणार्‍या ५ लाख आत्महत्यांपैकी १ लाख म्हणजे २० टक्के आत्महत्या भारतात होतात. मागील दोन दशकांमध्ये भारतातील आत्महत्यांचा दर ७.९ वरून १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

भारतातील ७७ टक्के मुलींवर लैंगिक अत्याचार ! – युनिसेफ

भारतामध्ये १५ ते १९ वर्षे  वयोगटातील ७७ टक्के मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, अशी माहिती ‘दी युएन् चिल्ड्रेन्स फंड’ने (युनिसेफने) ‘हीडन इन प्लेन साईट’ या शीर्षकाच्या अहवालात दिली आहे.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

रुग्णसेवा नाकारल्यास खासगी रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.

‘प्रगत’ भारतातील विदारक स्थिती !

‘जगात प्रत्येक ४० व्या सेकंदाला १ व्यक्ती स्वत:चेे आयुष्य संपवते, तर प्रत्येक ३ सेकंदाला १ जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. भारतात वर्षभरात सुमारे १ लक्ष लोक आत्महत्या करतात. त्यात १५ ते ३५ या वयोगटांतील तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.  

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.

देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !