बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढे यावे ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच, बांगलादेश

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू आणि त्यांच्या धार्मिक संस्था यांच्यावर अत्याचार होत आहेत.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष रवींद्र घोष यांच्या घरावर धर्मांधांचे पुन्हा आक्रमण

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू पळवण्यात आल्या.

बांगलादेशमध्ये अज्ञातांकडून श्री महाशन काली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

बांगलादेशमधील गोपालगंज या जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील श्री महाशन काली मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीची २ बोटे ९ मेच्या रात्री अज्ञातांनी तोडली, तसेच मंदिर परिसरात तोडफोड केली.

बांगलादेशात धर्मांधांनी एका हिंदूच्या घरावर अवैध ताबा मिळवून कुटुंबियांना घराबाहेर हाकलले

येथील ‘पार्टी कुचीलारपार’ भागात रहाणार्‍या श्री. कालाचंद मोंडल यांच्या कुटुंबाला स्थानिक शहर पालिकेच्या अध्यक्षाच्या भावाने खोटी कागदपत्रे सिद्ध करून घराबाहेर हुसकावून लावले.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारीवरील गुन्हा नोंद

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध ढाका महानगरपालिकेचे नगरसेवक हाजी नुरे आलम चौधरी यांनी कामारंगीर्चार पोलीस ठाण्यात तक्रार केली.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीन घरावर धर्मांधांचे आक्रमण

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी आक्रमण केले.

बांगलादेश येथील हिंदु मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलीस अधिकार्‍यांकडूनच धमक्या

एका हिंदु मुलीने धर्मांतर करण्यास विरोध दर्शवल्याने महंमद हसन आणि इतर २ धर्मांधांनी तिच्यावर अमानवी अत्याचार केले. त्या मुलीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे ती मृत्यूशी झुंज देत आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यात असलेल्या उत्तर महंमदपूर गावातील श्री कालीमाता मंदिरात धर्मांधांनी ५ मूर्तींची तोडफोड केली. याशिवाय येथील लाकडी मखराला आग लावून मंदिर पेटवून दिले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या गोठ्याला आग

बांगलादेशमधील फारीदपूर जिल्ह्यात असलेले चार बाश्पूर या भागातील हिंदु रहिवासी श्री. सुनील बिश्‍वास, श्री. सुबल बिश्‍वास, श्रीमती कामोना बिश्‍वास आणि श्रीमती ममता बिश्‍वास यांच्या गोठ्याला धर्मांधांनी आग लावली. या आगीत १ गाय, १ वासरू आणि २ बोकड जळून खाक झाले.

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार

बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात असलेल्या हिलाजाई या गावातील महंमद मोहिदूर (वय १८ वर्षे) या धर्मांधाने महंमद अब्दुस सलाम या अन्य एका धर्मांधाच्या साहाय्याने एका विवाहित हिंदु महिलेच्या घरात घुसून तिच्यावर पाशवी बलात्कार केला.


Multi Language |Offline reading | PDF