बांगलादेशातील चंदपूर जिल्ह्यात श्री दुर्गा आणि श्री काली मंदिरांवर धर्मांधांचे आक्रमण

चंदपूर जिल्ह्यातील दासपारा येथे श्री दुर्गा आणि श्री काली मंदिर यांवर १३० ते १५० सशस्त्र धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहीन ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

भगवंताच्या आशीर्वादामुळेच आम्ही बांगलादेशामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करू शकत आहोत. ‘बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ‘संतांचे आशीर्वाद आणि सदिच्छा’, हाच उपाय आहे’, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी परिसंवादाचे आयोजन

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ‘भीतीची भीती’ (scare of fear) या विषयावर तरुण पत्रकार कृष्णा दे आकाश यांनी १६ मार्च २०१९ या दिवशी शहरात परिसंवादाचे आयोजन केले होते.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’कडून ढाका येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या हिंदूंसाठी कार्य करणार्‍या मानवाधिकार संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च २०१९ या दिवशी ढाका येथे साजरा केला गेला.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना विस्थापित केले !

बांगलादेशमधील धर्मांधांनी तेथील इस्लामी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे कुटुंबीय यांची भूमी बलपूर्वक गिळंकृत करून त्यांना विस्थापित केले.

बांगलादेशातील धर्मांध मंत्र्याने हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना शिवीगाळ करत धमकावले !

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारी संघटना ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीनच बांधण्यात येत असलेल्या घरावर २५ मार्च २०१८ या दिवशी १०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून तोडफोड …….

बांगलादेशामधील अज्ञातांकडून हिंदु मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बांगलादेशामधील मुंशीगंज जिल्ह्यात असलेल्या ४ बिश्‍वनाथ या गावातील धर्मदेव आणि राधा मंदिरात काही दिवसांपूर्वी रात्री २ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश करून मंदिरातील धर्मदेव यांच्या मूर्तीचे मस्तक धडापासून वेगळे केले …..

बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

२३ जुलै २०१८ या दिवशी काही धर्मांधांनी बांगलादेशाच्या शेरपूर जिल्ह्यातील नलिताबारी उपजिल्ह्यामध्ये मोहसौशान काली मंदिर आणि खलभंग सार्वजनिक काली मंदिर यांमध्ये घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.

बांगलादेशात हिंदु मुलीचे धर्मांतरासाठी अपहरण

नारायणगंज जिल्ह्यात असलेल्या गोपालादीया गावातील रहिवासी १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. पूजा राणी घोष ही १४ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता तिच्या नातेवाइकांसह रथयात्रा बघायला गेली होती.

बांगलादेशामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर

बांगलादेशाच्या नारायणगंज जिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली.


Multi Language |Offline reading | PDF