‘जिहाद’ शब्दाचा वापर हा कोणाच्या आतंकवादी असण्याच्या संबंधात असू शकत नाही ! – न्यायालय

जिहाद’ शब्दाचा वापर हा कोणाच्या दहशतवादी (आतंकवादी) असण्याच्या संबंधात असू शकत नाही, असा निर्णय अकोला न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीत दिला आहे.

बकरी ईदच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु युवकाची निर्घृण हत्या

एम्आयएम् (मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन) पक्षाचा फलक लावण्यास विरोध केल्याच्या कारणावरून, तसेच अन्य काही प्रसंगांचा राग मनात धरून लक्ष्मीनगर येथील धर्मांधांच्या जमावाने निहाल लोंढे (वय १९ वर्षे) याची बकरी ईदच्या दिवशी निर्घृण हत्या केली.

सुरक्षादलांवर दगडफेक करणारे इस्लामविरोधी ! – अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे दिवाण जैनुल आबेदिन

जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी सुरक्षादलांवर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे इस्लामचे नाव अपकीर्त झाले, अशी टीका अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे दिवाण जैनुल आबेदिन यांनी केली आहे.

रोहतक (हरियाणा) येथे गोवंशाच्या हत्येमुळे तणाव

रोहतक जिल्ह्यातील टिटैली गावामध्ये बकरी ईदच्या दिवशी झालेल्या गोवंशाच्या हत्येच्या घटनेवरून येथे तणाव निर्माण झाला आहे. येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात हाणामारीही झाली, तसेच तोडफोडही करण्यात आली.

बकरी ईदच्या दिवशी गोरक्षणासाठी प्रयत्न करण्यापूर्वीच आमदार टी. राजासिंह यांना पोलिसांनी कह्यात घेतले

येथील अपक्ष आमदार टी. राजासिंह यांना बकरी ईदच्या आदल्या रात्री पोलिसांनी कह्यात घेतले. टी. राजासिंह गोरक्षकांच्या सुटकेसाठी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणार होते; मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच त्यांना कह्यात घेतले.

पुढील वर्षी बकरी ईदच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी पशूवध न होण्यासाठी प्रयत्न करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा तृणमूल काँग्रेस सरकारला आदेश

कोलकाता न्यायालयाने बंगाल सरकारला बंगाल पशूवध नियंत्रण कायदा १९५० वरून फटकारले आहे. न्यायालयाने तृणमूल सरकारला बकरी ईदनंतर, पुढील वर्षी सार्वजनिक ठिकाणी पशूवध होऊ नये, यासाठी सुनियोजित पद्धतीने पाऊले उचलावीत.

बर्धमान (बंगाल) येथे बकरी ईदच्या नमाजानंतर धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण

सामाजिक माध्यमांमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट केल्यावरून येथील समुद्रगड येथे धर्मांधांनी केलेल्या हिंसाचारामध्ये २० हून अधिक जण घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला असून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केरळमध्ये पुरात मशीद बुडाल्याने हिंदूंकडून मुसलमानांना बकरी ईदला मंदिरात नमाजपठण करण्याची अनुमती !

केरळमध्ये आलेल्या पुरामुळे येथील मशिदी पाण्यात बुडाल्या. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील माला शहराजवळील पुरुपिलिकव रक्तेश्‍वरी मंदिरामध्ये हिंदूंनी मुसलमानांना नमाजपठण करण्याची अनुमती दिली.

मुंबईत बकरी ईदनिमित्त २ लाख बकर्‍यांची कत्तल

बकरी ईदसाठी आतापर्यंत देवनार पशूवधगृहातून २ लाख बकर्‍यांची विक्री झाली. पुढील २ दिवस ही विक्री येथे चालूच रहाणार आहे. त्यामुळे यात वाढ होऊन ती अडीच लाख होण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, वसई, विरार यापर्यंत या बकर्‍या विक्रीस गेल्या आहेत.

श्रीनगरमध्ये बकरी ईदच्या दिवशी देशद्रोही फुटीरतावादी धर्मांधांनी सैन्यावर प्रचंड दगडफेक करत पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेट यांचे झेंडे फडकावले !

श्रीनगरमध्ये बकरी ईदच्या नमाजानंतर तेथील देशद्रोही फुटीरतावादी धर्मांधांनी भारतीय सैन्यावर प्रचंड दगडफेक केली. तसेच त्यांनी पाकचे आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावत घोषणाबाजी केली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF