CM Yogi On Bulldozer Action : बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी हवी ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘पुढील निवडणुकीनंतर राज्यातील सर्व बुलडोझर गोरखपूरच्या (मुख्यमंत्र्यांच्या  मतदारसंघाच्या) दिशेने फिरतील’ या अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया !

Manipur Terror attack : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार !

ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Waqf Bill Amendment Bill : वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयकाच्‍या संदर्भात भाजपने स्‍थापन केले ७ सदस्‍यीय पथक !

भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍याक आघाडीने वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयक,२०२४ च्‍या संदर्भात ७ सदस्‍यांचे पथक स्‍थापन केले आहे. या पथकामध्‍ये उत्तराखंड, मध्‍यप्रदेश, हरियाणा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्‍या वक्‍फ बोर्डाचे अध्‍यक्ष आणि भाजप अल्‍पसंख्‍याक मोर्चाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीचे दोन सदस्‍य यांचा समावेश आहे.

Charkhi Dadri Lynching : दादरी (हरियाणा) येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून साबिर मलिक याचा मारहाणीत मृत्यू !

अटक करण्‍यात आलेल्‍या ५ जणांपैकी २ जण अल्‍पवयीन !

Rajasthan High Court : २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणार नाही !

तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला होता, हे स्पष्ट आहे !

AP Temple Priests Salary Hike : हिंदूंच्‍या मंदिराच्‍या पुजार्‍यांच्‍या वेतनात ५० टक्‍के वाढ !

सरकारने त्‍याच्‍या कह्यातील सर्व मंदिरे आता भक्‍तांच्‍या नियंत्रणात दिली पाहिजेत. मंदिरांचे व्‍यवस्‍थापन करणे सरकारचे काम नाही, तर ती भक्‍तांची सेवा असल्‍याने त्‍यांच्‍यात हातात ती देणे आवश्‍यक आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे !

Jesus & Mary Pictures : कर्नाटक शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर ‘येशू ख्रिस्त’ आणि ‘मेरी’ यांची चित्रे !

आता कर्नाटकमधील धर्मप्रेमी हिंदु जनतेने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सहस्रोंच्या संख्येने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराकडे जाऊन याविषयी विचारणा करायला हवी. तरच काँग्रेस वठणीवर येईल !

Bengal Bandh : बंगालमध्‍ये भाजपने पुकारलेल्‍या ‘बंद’ला तृणमूल काँग्रेसचा हिंसक विरोध !

गुंड, आतंकवादी, कट्टरतावादी, बलात्‍कारी यांचा भरणा असलेल्‍या तृणमूल काँग्रेससारख्‍या राजकीय पक्षाकडून अशा प्रकारे प्रतिक्रिया उमटणे यात काय आश्‍चर्य ?

Rajya Sabha Members : राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ !

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांपैकी भाजपच्या ८, तर भाजपच्या मित्रपक्षांच्या ३  सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोचली आहे.

Karnataka Rape Cases : कर्नाटकात गेल्‍या ७ महिन्‍यांत बलात्‍काराच्‍या तब्‍बल ३४० प्रकरणांची नोंद !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्‍यामुळे ही स्‍थिती निर्माण झाली आहे, असे म्‍हटल्‍यास चुकीचे काय ?