स्वतःच्या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे !
‘अनेक जण मधुमेह बरा व्हावा, यासाठी स्वतःच्या मनाने कारले, जांभूळ बी इत्यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.
‘अनेक जण मधुमेह बरा व्हावा, यासाठी स्वतःच्या मनाने कारले, जांभूळ बी इत्यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.
‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्वतःचे आरोग्य अबाधित रहाणार आहे.
‘काही जण आहार नियंत्रणाच्या (डायटिंगच्या) नावाखाली केवळ कोशिंबिरी खाऊन राहतात. काही जण भात किंवा पोळी यांसारखे पिष्टमय पदार्थ अत्यंत अल्प आणि कोशिंबिरी (सॅलड) भरपूर प्रमाणात खातात.
अंगावर पित्त उठून खाज येत असल्यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते.
आताच्या काळात शेवग्याच्या फांद्या लावल्या, तर त्यांना मुळे फुटतात. आवश्यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरात शेवग्याचे न्यूनतम एक झाड लावावे. आपत्काळासाठी हे झाड पुष्कळ उपयुक्त आहे.
‘ताप आलेला असतांना सहजपणे पचणारा आहार हवा. मोड आलेली कडधान्ये, दूध, दही, काकडी, बटाटा, बीट, रताळी, सुरण यांसारख्या कंदभाज्या, फळे, तसेच विविध कोशिंबिरी हे सर्व पदार्थ पचायला जड असतात.’
नेहमी उरलेले अन्न शीतकपाटात ठेवून पुन्हा गरम करून जेवणे योग्य नव्हे. कधीतरी असे केल्यास चालू शकते; परंतु प्रतिदिन असे करू नये. एक वेळ अन्न थोडे कमी जेवल्यास चालू शकते; पण प्रतिदिन शिळे खाऊ नये. यासाठी आवश्यक तेवढेच अन्न बनवावे.
उन्हाळा आणि शरद ऋतू सोडून अन्य वेळी मातीच्या मडक्यातील पाणी पिऊ नये. या काळात स्टील किंवा कलई केलेले तांबे-पितळ यांच्या भांड्यातील पाणी प्यावे.’
‘घरात सोफा असला, तरी स्वतः त्यावर कधीही बसू नये. सोफ्याचा वापर केवळ पाहुण्यांना तात्पुरते बसण्यासाठी करावा. ज्यांच्याकडे सोफा नाही, त्यांनी हे विकतचे दुखणे घरी न आणलेलेच चांगले. त्याऐवजी खुर्च्या वापराव्यात.’