तापामध्ये दही का खाऊ नये ?
दह्यामध्ये प्रथिने जास्त असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्यक असते’, या अर्धसत्य ज्ञानामुळे कोरोनाच्या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्ती मंदावून फुप्फुसांमध्ये पाणी होऊन रुग्ण अत्यवस्थ झाल्याची अनेक उदाहरणे वैद्यांच्या लक्षात आली.