Anti-Hindu Statements : (म्हणे) ‘भाजप स्वतःच्याच लोकांकडून अयोध्येत बाँबस्फोट घडवून त्याचे खापर पाकिस्तान आणि मुसलमान यांच्यावर फोडेल !’ – अजय यादव, राष्ट्रीय जनता दल
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे आमदार अजय यादव !
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे आमदार अजय यादव !
आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे !
आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.
भाग्यनगर येथील चल्ला श्रीनिवास शास्त्री हे ६४ वर्षीय रामभक्त ८ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करून अयोध्येत पोचणार आहेत. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या पादुका असणार आहेत. त्यांचे मूल्य अनुमाने ६४ लाख रुपये आहे.
आत्मघातकी आक्रमणे रोखण्यासाठी मंदिराभोवती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षणव्यवस्था सिद्ध करण्यात येत आहे. मंदिराचा परिसर सीसीटीव्हीने सुसज्ज केला जात आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुरक्षा कर्मचार्यांची संख्या अजूनही वाढू शकते.
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या ‘श्रीराम मंदिर’ उद्घाटनाच्या आणि ‘श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने’चे घरोघरी जाऊन अक्षता (निमंत्रण) देण्यास १ जानेवारी २०२४ पासून प्रारंभ करण्यात आला.
आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.
अयोध्या येथे होणार्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता.
ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले आहे. या संदर्भात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी त्यांची कर्नाटक येथील मांजरी (तालुका चिकोडी) येथे जाऊन भेट घेतली.