भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे

ब्रिटिशांना भारतावर राज्य करतांना शेळपट, गुलाम सिद्ध करायचे होते. तशी शिक्षण पद्धती मेकॉलेने काढली. संस्कृत भाषा हद्दपार केली. आपण वेद वाचायचे बंद केले. हिंदु असण्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही.

जोधपूर न्यायालयाने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका स्वीकारली !

‘आश्रम’ या वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्ध याचिका जोधपूर न्यायालयाने स्वीकारली आहे. अधिवक्ता खांडेलवाल यांनी ३ वर्षांपासून याविषयी न्यायालयीन लढा दिला.

नाशिक येथे ३ टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या !

तरुणींनो, टवाळखोरांच्या त्रासामुळे आयुष्य संपवण्यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्यांना वेळीच प्रत्युत्तर द्या !

पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.

गोरक्षक मोनू मानेसर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलेच नाही !

मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.

जहानाबाद (बिहार) येथे पंचायत भवनात घुसून १०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी केली खंडणीची मागणी !

१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.

छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या महिला आमदारावर चाकूद्वारे आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात स्वपक्षाच्याच महिला आमदार असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य जनता कधीतरी सुरक्षित असेल का ?

केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली !

सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा वरील प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

आफ्रिकी देश मालीमध्ये झालेल्या बंदूकधार्‍यांच्या आक्रमणात २१ लोक ठार !

आफ्रिकी देश मालीमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी बंदूकधार्‍यांनी केलेल्या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ११ जण घायाळ झाले. हे आक्रमण मध्य मालीच्या मोप्ती क्षेत्रात असलेल्या एका गावात करण्यात आले.

पाकच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ११ मजूर ठार !

पाकच्या उत्तरी वजीरिस्तानच्या गुलमीर कोट परिसरात १९ ऑगस्ट या दिवशी आतंकवाद्यांनी एका वाहनावर आक्रमण केले. या वेळी घडवलेल्या बाँबस्फोटात वाहनातील ११ मजूर ठार झाले, तर दोन जण घायाळ झाले.