हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या पत्नीला ६९ वर्षांनी मिळाले निवृत्ती वेतन !

सरकारी कार्यालयाची अक्षम्य चूक ! सैनिक देशासाठी स्वतःचे प्राणत्याग करतात; मात्र सरकारी कर्मचार्‍यांना त्याविषयी कोणतीही संवेदना नाही, हे लज्जास्पद आहे ! अशा चुका करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.

पाकचे षड्यंत्र !

‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.

(म्हणे) ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणार्‍या चर्चेविषयी आनंदच !’ – चीन

चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.

चिनी सैनिक पँगाँगमधून हटले, तरी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील धोका टळलेला नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले.

गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !

भूमीच्या अतिक्रमणावरून मेजर जनरल आणि मालमत्ता अधिकारी यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.