परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या होणाऱ्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करतांना त्यांना आलेली अनुभूती !

साधकांनो, ‘साक्षात् भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले साधकांना याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणार आहेत’, अशी श्रद्धा ठेवा !

ऑस्ट्रिया येथील इतिहासकार आणि राजकारणी डॉ. नास्को यांची एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी झालेली भेट !

गेल्या काही मासांपासून ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले युरोपमध्ये अध्यात्मप्रसारानिमित्त दौरा करत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांची ऑस्ट्रिया येथील लोकप्रिय नेते डॉ. नास्को यांच्याशी भेट झाली.

व्यवस्थितपणा, अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असलेले सनातनचे १०७ वे समष्टी संत अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद !

‘अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांची चैत्र अमावास्या (३०.४.२०२२) या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर आणि अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर आणि अंत्यविधीच्या वेळी सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्रीमती मिथिलेश कुमारी यांना जाणवलेली सूत्रे पुढील लेखात दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजपाला आरंभ केल्यावर न्यास करून नामजप करतांना ज्याप्रमाणे शक्ती जाणवते, त्याप्रमाणे मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्ती जाणवली.

आपल्या संत-मातेची, पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची सेवा करतांना सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. आजींच्या देहत्यागानंतर लक्षात आलेली सूत्रे

सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची वैशाख शुक्ल प्रतिपदा (रविवार, १ मे २०२२)  या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांची धाकटी मुलगी सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

शारीरिक त्रास होत असतांना सौ. अंजली कणगलेकर यांनी अनुभवलेली भगवंताची कृपा !

साधकांसाठी आपत्काळ हा संपत्काळ ठरत आहे’, असे वाटते. ‘भगवंत साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेत आहे. साधकांना पुढच्या प्रसंगांना तोंड देण्याचे बळ देत आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकवत आहे’, हेच मला या प्रसंगातून अनुभवता आले.

कष्टाळू, त्यागी वृत्तीच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कोची, केरळ येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) प्रियदर्शिनी बांदिवडेकर !

२६.१२.२०२१ या दिवशी कोची, केरळ येथील श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. केरळ येथील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.